शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपकालीन कर्मचा-यांच्या वेतन कपातीवर आज चर्चा

By admin | Updated: September 21, 2016 02:02 IST

अकोला मनपाची बुधवारी सभा; वेतन कपातीला स्थगिती देण्यासाठी स्थायी समितीकडे अर्ज.

अकोला, दि. २0 - चौदा दिवसांच्या संप काळातील मनपा कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात यावे. या आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध अकोला महापालिका कर्मचारी-सेवानवृत्त कर्मचारी संघर्ष समितीने, स्थायी समितीकडे अर्ज केला आहे. बुधवारी होणार्‍या या सभेत यावर चर्चा होणार आहे.अकोला महापालिकेचे शेकडो कर्मचारी थकित वेतनाच्या मागणीसाठी २५ जूनपासून सलग १४ दिवस बेमुदत संपावर गेले होते. महापालिकेचे कामकाज प्रभावित झाल्याच्या भूमिकेतून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी संप काळातील कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचे आदेश २२ ऑगस्ट २0१६ रोजी दिले. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी हादरले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६ (४) पोटकलम (१) खंड ह्यडह्ण अन्वये स्थायी समितीकडे अर्ज करून यावर स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला आहे. कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले यांनी केलेल्या या अर्जावर बुधवारच्या स्थायी समितीत चर्चा होणार आहे. २0१५-१६ च्या वार्षिक लेख्याबाबत स्थायी समितीने सकाळी ११ वाजता सभा बोलाविली आहे. अकोला महापालिका कर्मचार्‍यांचे साडेतीन महिन्यांचे वेतन पुन्हा थकित झाले आहे. मे महिन्याच्या वेतनानंतर महापालिका प्रशासनाने वेतन दिलेले नाही. जून ते सप्टेंबर उजाळला तरी वेतनाची साधी चर्चादेखील नाही. मागील एका आंदोलनादरम्यान दत्तू वानखडे नामक कर्मचार्‍याने आत्महत्या केली होती. तेव्हा राज्य शासनाने तातडीने १५ कोटी मंजूर करून कर्मचार्‍यांचे वेतन केले होते. त्यानंतर कर्मचार्‍यांचे वेतन नियमित करण्याची तंबी दिली होती; मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ही विस्कटलेली घडी अजूनही नीट झाली नाही.थकित वेतनाच्या मागण्यांसाठी अकोला महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने ११ फेब्रुवारी२0१६ रोजी पत्र दिले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला गेला होता. दरम्यान, १ मार्च रोजी आयुक्तांना चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यांनी वेतन देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. दरम्यान, ११ फेब्रुवारीची नोटीस कायम ठेवून १९ मे रोजी पुन्हा आंदोलनाबाबत अवगत करण्यात आले. त्याचीही दखल न घेतल्याने अखेर २५ मे १६ पासून ७ जूनपर्यंंंंत कर्मचार्‍यांनी बेमुदत आंदोलन छेडले. त्यामुळे आमचे आंदोलन बेकायदेशीर नाही. आमच्या मागण्या अवास्तव नव्हत्या.-विठ्ठल देवकते, सचिव, कर्म. संघ. समिती मनपा, अकोला.