शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटपात भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 15:00 IST

अकोला : विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटप करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भेदभाव केला जात असून, त्याचा फटका आधीपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाºयांना बसत आहे.

अकोला : विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटप करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भेदभाव केला जात असून, त्याचा फटका आधीपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाºयांना बसत आहे. विशेष म्हणजे, निवासस्थान वाटपात संबंधितांकडून मनमानी करण्याचे प्रकारही घडत असल्याचे गेल्या काही महिन्यांतील निवासस्थान वाटपाच्या पद्धतीतून पुढे आले आहे.शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांना शासकीय निवासस्थान देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. संबंधित विभाग प्रमुखांमार्फत कर्मचाºयांचे विनंती अर्ज बांधकाम विभागाकडे जातात. त्या विभागात अर्ज प्राप्त होण्याच्या ज्येष्ठतेनुसार निवासस्थान वाटप करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित आहे; मात्र त्या ठिकाणी या बाबींकडे दुर्लक्ष करीत नव्याने अर्ज करणारे, नियुक्ती असलेल्यांनाही निवासस्थान वाटप करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच निवासस्थानात काही समस्या असल्यास ते बदलवून देण्याचे अर्जही या विभागाकडे दिले जातात. त्या प्रक्रियेतही तोच प्रकार घडत असल्याने अनेक विभागाचे कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही काहीच फायदा होत नसल्याने कर्मचारी तक्रार करण्यास टाळण्याच्या मानसिकतेत आले आहेत. कुटुंबात वृद्ध आई-वडील, लहान बालके असतानाही त्यांना चौथ्या माळ्यावरील गैरसोयीचे निवासस्थान देणे, त्याचवेळी एकटे असलेल्या कर्मचाºयांना सोयीचे निवासस्थान देण्याचा प्रकारही काही दिवसांआधीच या विभागात घडला आहे. याप्रकरणी बांधकाम विभागातील संबंधितांना न्यायोचित पद्धतीने निवासस्थान वाटप करण्यासाठी बाध्य करावे, अशी मागणी आता विविध विभागातील कर्मचाºयांकडून होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग