शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याचा जिल्ह्याला विळखा!

By admin | Updated: March 10, 2017 02:35 IST

अकोला जिल्हय़ात १३६ पाणी नमुने आढळले दूषित: नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

अतुल जयस्वाल अकोला, दि. ९- उन्हाळय़ाची चाहूल लागल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात मग्न असतानाच, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १३२४ पाणी नमुन्यांपैकी १३६ नमुद्मो दूषित आढळून आले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाण्याचे स्रोत दूषित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत फेब्रुवारी महिन्यात जिल्हय़ातील ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८0७ गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी, हातपंप इत्यादी जलस्रोतांचे पाणी नमुने आरोग्य कर्मचार्‍यांकडून घेण्यात आले. जिल्हय़ातील सातही तालुक्यांमधील ८0७ गावे आणि नागरी भागांमध्ये घेण्यात आलेले १ हजार ३२४ पाणी नमुने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पाणी नमुने तपासणीचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून ८ मार्च रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. या अहवालानुसार १३६ पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले. पाणी नमुने दूषित आढळून आल्याने, संबंधित जलस्रोतांचे पाणी पिण्यासाठी योग्य नसले, तरी नागरिकांना या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ४१ गावे ब्लिचिंग पावडरविनाजिल्हय़ातील सात तालुक्यांपैकी अकोला, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर या चार तालुक्यांतील ४१ गावांमध्ये पाणीपुरवठा करताना ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याचे आढळून आले. अकोला तालुक्यातील १९, बाश्रीटाकळी तालुक्यातील पाच, बाळापूर तालुक्यातील १५ आणि पातूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांमध्ये मात्र सर्व गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे.९ ग्रामपंचायतींना 'रेड कार्ड'ज्या पाण्याच्या स्रोतावर गावातील ७0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या अवलंबून असते, अशा स्रोतांचे पाणी नमुने दूषित आढळून आल्यास त्या ग्रामपंचायतींना ह्यरेड कार्डह्ण जारी केले जाते. जिल्हय़ात ९ ग्रामपंचायतींना रेड कार्ड देण्यात आले आहे.