शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू

By संतोष येलकर | Updated: October 3, 2023 19:33 IST

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम

अकोला : गेल्या ७५ वर्षांत दिव्यांगांना साधे घरही मिळाले नसल्याचा आरोप करीत, दिव्यांगांना केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करून दिव्यांगांना ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील पोलिस लाॅन येथे आयोजित दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने आमदार किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकूल, निर्वाह भत्ता आदी विविध योजनांच्या अनुदानाचे धनादेश व कृत्रिम अवयवाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी, तर संचालन मनीषा शेजोळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.दिव्यांगाना दरमहा ५ तारखेच्याआत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे !

सरकारकडून अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदारांना वेळेवर पगार दिला जातो; मात्र दिव्यांगांना दरमहा दिले जाणारे अर्थसाहाय्य तीन ते सहा महिने मिळत नाही, असे सांगत दिव्यांगांना दरमहा ५ तारखेच्या आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे बच्चू कडू यांनी यांनी स्पष्ट केले.दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या !घरकूल, अंत्योदय आदी याेजनांचा लाभ मिळाला नसल्याने दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या, अशी मागणी करीत दिव्यांगांना हक्कासाठी लढावे लागेल, असे कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू