शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

दलितेतर-नगरोत्थान निधीवरून वादंग!

By admin | Updated: June 29, 2017 01:16 IST

दोन्ही ठराव बेकायदेशीर : काँग्रेसचा आरोप; एलईडीप्रकरणी चौकशी समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दलितेतर आणि नगरोत्थानच्या विकास निधी वाटपावरून बुधवारच्या महापालिका आमसभेत रणकंदन झाले. मालमत्ता करवाढ आणि विकासाच्या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र दिसत असले, तरी दलितेतरच्या मुद्यावर सभागृहात काँग्रेस पदाधिकारी एकाकी पडले. त्यामुळे काँग्रेसला सभागृहात ठिय्या आंदोलन छेडावे लागले. दोन्ही ठराव बेकायदेशीर संमत होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने याप्रकरणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय जाहिर केला.महापालिकेच्या बुधवारच्या आमसभेत दहा ठराव सभागृहात मजंूरीसाठी ठेवले होते. मागील सभेच्या इतिवृत्तासह वाढीव हद्द व शहरातील काही भागात पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकणे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याबाबतचे ठराव संमत झाले. अकोला महापालिकेचे क्रीडा धोरण ठरविणे आणि महापौर क्रीडा चषक घेणे, याला इरावांना मंजुरी देण्यात आली. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील सुविधेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत एलईडी लाइट लावण्याचा विषयालाही मंजुरी दिली गेली. हा विषय मंजूर करीत असताना मात्र एलईडीच्या २० कोटींच्या कंत्राटाचा वादग्रस्त विषय काढला गेला. याच्या चौकशीसाठी उपमहापौर वैशाली शेळके यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. अनेक नगरसेवकांनी सध्याच्या कंत्राटदारावर नाराजी व्यक्त केली. आयुक्त वेळ देत नसल्याचा मुद्दा निकाली काढत, यापुढे दररोज ४ ते ६ ही वेळ नगरसेवकांसाठी आयुक्तांनी राखीव ठेवली आहे. होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या आरक्षणात फेरबदलाची कारवाई करून वाहनतळाचे आरक्षण प्रस्तावित करण्याचा आणि केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत अकोला पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीएसटी लागू होत असल्याने अंदाजपत्रक दरातील फरकाची रक्कम मनपा निधीतून देण्याचा विषय स्थगित करण्यात आला. ऐन वेळेवर येणारे विषय गडबडीत नारेबाजीत संमत करण्यात आले.पोशाखासाठी पालकांची थट्टा - मंजूषा शेळकेपाचशे रुपयांचा शाळेचा पोशाख मिळण्यासाठी पालकांना पाचशे रुपये भरून बँक खाते काढावे लागत आहे. यासाठी शून्य रकमेत खाते उघडण्यासाठी महापालिकेने आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी येथे मांडला.मनपातील अपहारात आम्हीही आहोत का? - सुभाष खंडारेदोन दिवसांआड महापालिकेच्या बातम्या झळकतात. विविध योजनेत, कंत्राटात अपहार होत आहे. यावर महापालिकेने बाजू स्पष्ट करावी. आम्ही या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप नागरिक करतात, त्याचे काय करावे, असा प्रश्न भाजप नगरसेवक सुभाष खंडारे यांनी व्यथित होऊन उपस्थित केला.नगरसेवकांसाठी लवकरच कार्यशाळारमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील बारकावे त्यातील त्रुटी, कायदेशीर येणाऱ्या अडचणी सोडवून सर्वांना घरे मिळवून देण्यासाठी राज्यात अकोला महापालिकेने पुढाकार घेतला. यातील डीपीआर आणि तांत्रिक माहिती समजून घेण्यासाठी नगरसेवकांची कार्यशाळा लवकरच घेतली जाणार आहे, असेही सभागृहात सांगितले गेले.आमदार बाजोरिया भेटले आयुक्तांनादलितेतर आणि नगरोत्थानच्या विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी आल्याने शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, विरोधी पक्षनेता साजिद खान आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.मी मतदानाला घाबरतो - महापौर दलितेतर आणि नगरोत्थानाच्या विकास निधी वाटपाच्या विषयाला दिलेली मंजुरी गैरकायदेशीर आहे. याप्रकरणी सभागृहात मतदान घ्या, अशी मागणी नगरसेवक डॉ. जिशान खान यांनी केली असता, महापौर अग्रवाल यांनी मी मतदानाला घाबरतो, असे उत्तर दिले. त्यावर आयुक्तदेखील आवाक झालेत.शाळा प्रवेशोत्सवात नगरसेवकांना टाळलेमहापालिका शाळांची स्थिती बरोबर नसताना महापालिकेच्या शिक्षणाधिकारी नगरसेवकांना प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात बोलावत नाही, तसेच शाळेतील अनेक शिक्षकांच्या बदल्या अलीकडे करून त्यात अपहार करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला.