शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल-ऑनलाइन’ सात-बारा स्वातंत्र्यदिनापासून! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:44 IST

अकोला: जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ‘डिजिटल’ स्वाक्षरीसह ‘ऑनलाइन’ सात-बारा वितरण १५ ऑगस्टपासून (स्वातंत्र्यदिन) सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

ठळक मुद्देवितरणाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार जिल्हय़ातील १ हजार १0 गावे असून, ३ लाख ५३ हजार ७९३ सात-बारा आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ‘डिजिटल’ स्वाक्षरीसह ‘ऑनलाइन’ सात-बारा वितरण १५ ऑगस्टपासून (स्वातंत्र्यदिन) सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हय़ातील १ हजार १0 गावे असून, ३ लाख ५३ हजार ७९३ सात-बारा आहेत. जिल्हय़ातील सर्व सात-बाराचे सन २0१२ मध्ये संगणकीकृत करण्यात आले असून, ऑनलाइन करण्यात आले आहेत. संगणकीकृत करण्यात आलेल्या सात-बारामधील त्रुटीची दुरुस्ती करून सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, १५ ऑगस्टपासून जिल्हय़ातील शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सात - बारा वितरित करण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच जिल्हय़ातील प्रत्येक तलाठी साजाच्या ठिकाणी किमान पाच शेतकर्‍यांना ऑनलाइन सात-बाराचे वितरण करण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

ग्रामसभांमध्ये चर्चा!डिजिटल ऑनलाइन सात-बारासंबंधी जिल्हय़ात जनजागृती करण्यासाठी गावागावात चित्ररथ फिरणार असून, ४६ महाविद्यालयांमध्ये या विषयावर विद्यार्थ्यांच्या वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभांचे आयोजन करून, या विषयावर चर्चा घडवून आणण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.