शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत भेदभाव

By admin | Updated: July 4, 2014 00:43 IST

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मनपाने भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून आले

अकोला : जुने शहरातील डाबकी रोड परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मनपाने भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परवानगी नसल्याच्या सबबीखाली चक्रनारायण यांच्या मालकीच्या जागेतील वेल्डिंग वर्क शॉप जमीनदोस्त केल्याने या भागात गुरुवारी तणावाचे निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांचा रोष पाहता, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व इतर अधिकार्‍यांनी कारवाई अर्धवट सोडून निघून जाणे पसंत केले. शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केला असला तरी संबंधित अधिकार्‍यांची अतिक्रमकांसोबत असलेली हातमिळवणी पारदश्री कारवाईच्या आड येत आहे. या बाबीचा प्रत्यय गुरुवारी डाबकी रोड परिसरात दिसून आला. रस्त्यापासून दूर अंतरावर असलेल्या दुकानांच्या पाट्या, पायर्‍या-ओटे तोडण्यात आले. यामध्ये मास्टर पॉवर जीम, आकांक्षा वेल्डिंग वर्क शॉप, श्रीराम टॉवर आदींचा समावेश आहे. यादरम्यान, चक्क कॅनालच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमित जकात नाक्याला मात्र अभय देण्यात आले. अर्थातच काही ठिकाणचे अतिक्रमण काढल्यानंतर काही अतिक्रमणाकडे पूर्णत: पाठ फिरवल्याचे चित्र होते. या संपूर्ण कारवाईमध्ये मनपा अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला.