अकोला: संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन महोत्सव बुधवारी जिल्ह्यात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावांत तसेच शहरातील गल्लोगल्लीत संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनामित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाने संपूर्ण शहर गजाननमय झाले होते. गत काही दिवसांपासून शहरातील विविध भागातील संत गजानन महाराज यांचे मंदिर तसेच विविध कॉलनीमध्ये मंडप टाकून गजानन विजय ग्रंथ, कथा सप्ताह, भजन, कीर्तन आणि भागवताचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचा समारोप प्रकट दिनी करण्यात आला. त्यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शहरातील कौलखेड चौक, शास्त्रीनगर, मुकुंदनगर, आनंदनगर, गजानन मंदिर, बलोदे लेआऊट, खदान परिसर, इन्कम टॅक्स चौक, सिंधी कॅम्प, आदर्श कॉलनी, सवरेपचार रुग्णालयासमोरील मंदिर तसेच शहरातील बहुतांश मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच या मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी घरीही महाप्रसादाचे आयोजन केले होते. प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्तिरसात न्हाऊन निघाले भक्तगण
By admin | Updated: February 12, 2015 01:21 IST