शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१५७ दिवसांच्या आचारसंहितेने अडली विकास कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:24 IST

जिल्हा परिषदेची सर्वच कामे प्रभावित झाली असून, ३१ मार्चच्या मुदतीत ती पूर्ण होणे अशक्य आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: गत वर्षभराच्या संपूर्ण काळात जवळपास १५७ दिवस आचारसंहितेत गेली, त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वच कामे प्रभावित झाली असून, ३१ मार्चच्या मुदतीत ती पूर्ण होणे अशक्य आहे.ती कामे पूर्ण करण्यासोबतच निधी खर्च करण्यासाठी किमान पाच महिने किंवा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी, या मागणीचे पत्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना १६ मार्च रोजीच दिले आहे. त्यावर मुदतवाढीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेमार्फत विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील विविध कार्यक्रमांसाठी निधी प्राप्त आहे. त्यातच हा निधी २०१८-१९ मधील शेवटच्या म्हणजेच मार्चअखेर मंजूर करून वितरित करण्यात आला होता. ऐन मार्चअखेर निधी मिळाल्याने ती कामे पूर्ण करण्यात अडचणी होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या २०१९-२० या वित्तीय वर्षात निवडणुकीच्या आचारसंहितेत १५७ दिवसांचा कालावधी उलटला. आचारसंहितेच्या काळात त्या कामांची प्रक्रिया पूर्ण करणेही अशक्य झाले. त्यातच कामांच्या निविदा जाहिराती देणे, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश देणे, ही कार्यवाही पूर्ण झाली नाही. मंजूर निविदा स्वीकृतीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला आहेत. काही कामांची निविदा स्वीकृती प्रक्रिया त्यासाठी रखडली. त्यामुळे शेकडो कामांसाठी प्राप्त असलेला निधी ३१ मार्चअखेर पूर्णपणे खर्च होऊ शकत नाही. तो निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी केली आहे.कोट्यवधींच्या कामांचा वांधाजिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गतवर्षी मार्चअखेर देण्यात आला. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीने निधी खर्चाची प्रक्रिया रोखली. त्यानंतर काही दिवसांतच राज्याच्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. नोव्हेंबरमध्येच जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. या सगळ््या गदारोळात विकास कामांचा मार्गच खुंटला. त्यासाठी आता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद