शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक!

By admin | Updated: March 16, 2017 02:46 IST

जिल्हाधिका-यांचे प्रतिपादन; पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी गरजेची.

अकोला, दि. १५- लिंग गुणोत्तराचे प्रमाण घटणे ही चिंताजनक बाब असून, समाजातील मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक असून, त्याची जनसामान्यात जनजागृती करणे आवश्यक आहे. जिल्हय़ात कोणीही या कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यावर कायद्याप्रमाणे कडक शिक्षा करण्यात येईल. भ्रूणहत्या रोखण्यासाठी सर्वसामान्यापासून ते माध्यमापर्यंंत सर्वांंंनी चळवळ म्हणून हे काम हाती घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात गर्भलिंग निदानाच्या वाढत्या घटनांच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जनसामान्यांना पीसीपीएनडीटी कायद्यासंदर्भात माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, की पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कोणत्याही नोंदणीकृत/अनोंदणीकृत डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तशी माहिती देणार्‍या व्यक्तीस संबंधितांवर खटले दाखल झाल्यानंतर खबरी योजनेंतर्गत २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येते, तसेच एक किंवा दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणार्‍या लाभार्थीला सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणार्‍या लाभार्थीला १0 हजार रुपये देण्यात येतात. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनीही पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. गर्भनिदानाचे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार, विभागीय दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने बुलडाणा जिल्हय़ातील नांदुरा, अकोला जिल्हय़ात अकोट, मूर्तिजापूर येथे कारवाई केल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. अँड. शुभांगी खांडे यांनी पॉवर पाइंट प्रेझेंटेशनद्वारे पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांची उपस्थिती होती.