शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘तोतया पोलिस’ पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: July 5, 2014 23:42 IST

शहरामध्ये पोलिस असल्याची बतावणी करून इसमांना लुटणार्‍या आरोपीचा शोध घेण्यात डीटेक्शन ब्रँचच्या पथकाला यश आले.

वाशिम : गेल्या अनेक दिवसापासुन वाशिम शहरामध्ये पोलिस असल्याची बतावणी करून इसमांना लुटणार्‍या आरोपीचा शोध घेण्यात डीटेक्शन ब्रँचच्या पथकाला ४ जुलै रोजी यश आले. अविनाश आश्रुबा पवार असे आरोपीचे नाव असुन त्याला न्यायालयाने ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शहराभरात कौतुक होत आहे. वाशिम शहरामध्ये गेल्या १५ दिवसापासुन पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याच्या तीन ते चार घटना लागोपाठ घडल्या. सातत्याने घडणार्‍या या घटनेमुळे पोलिसांना आरोपिचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे झाले होते. स्थानिक अकोला नाका येथे १ जुलै रोजी मसला पेन येथील तहकिक या इसमाला रात्री १0:३0 वाजताचे सुमारास लुटले होते. त्यानंतर रविवार बाजारामध्ये शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी नयन अरूण बंड या विद्यार्थ्यांच्या खिशामधून रोख ३ हजार रूपये व त्याचा मोबाईल लंपास केला होता. या सर्व घटना लागोपाठ घडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. या सर्व घटनेमुळे पोलिस यंत्रणाही हतबल झाली होती. अखेर नव्यानेच स्थापन केलेल्या डीटेक्शन ब्रँचचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर यांनी तपासाची सुत्रे आपल्या हाती घेतली. सोयस्कर व त्यांच्या टिमने पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनात तोतया पोलिसाचा शोध घेणे सुरू केले. अखेर तोतया पोलिस म्हणुन वावरत असलेला वाशिम तालुक्यातील काटा येथील अविनाश पवार या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपिची ओळख पटविण्यासाठी मसला पेन येथील फिर्यादी तहकिक व पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी बंड याला पोलिस स्टेशनला बोलावून आरोपी हा पवार आहे काय याची ओळख परेड घेतली. या ओळख परेडमध्ये फिर्यांदींनी अविनाश पवार हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तोतया पोलिस पवार याला अटक करून आज ५ जुलै रोजी वाशिम येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी आरोपी अविनाश पवार याला ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.