शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळे पाडणार !

By admin | Updated: August 13, 2016 01:48 IST

अकोला जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू : उपविभागीय अधिका-यांनी घेतली बैठक.

अकोला, दि. १२ : जिल्हय़ातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सन २00९ नंतर उभारण्यात आलेली जिल्हय़ातील नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.रस्त्यावरील व रहदारीला अडथळा ठरणारी सरकारी जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हय़ातील महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हय़ातील एकूण अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करण्याच्या पहिल्या टप्प्यात २९ सप्टेंबर २00९ नंतर उभारण्यात आलेली जिल्हय़ातील नगरपालिका आणि ग्रामीण भागातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. यासंदर्भात गत ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याच्या कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मदतीने अनधिकृत धार्मिक स्थळे निष्काशित करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले. जिल्हय़ातील नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील अनकिृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात अकोला व बाश्रीटाकळी तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान श्रावण महिन्यात येणारे धार्मिक उत्सव व सण लक्षात घेता या कारवाईबाबत प्रशासन अतिशय सावधगिरीने पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंगही होता कामा नये, याची दक्षताही घ्यावी लागत आहे.