शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नियतीलाही पाहवले नाही अनाथ अनुराधाचे सुख; लग्नाच्या दहा दिवस आधीच झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:33 IST

Akola News अनुराधाला अनाथाश्रमातच विजेचा झटका लागला आणि काही क्षणातच तिचा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ठळक मुद्देअनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले हाेते.शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली.अनाथाश्रमामध्ये मंगळवारी सायंकाळी वरच्या माळ्यावर विजेचा धक्का लागला. अनुराधाचा मृत्यू हाेताच एका संसारवेलीचा सुरुवात हाेण्यापूर्वीच घात झाला.

अकाेला : गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरल्यानंतर पती मिळाला. कुटुंब मिळाले. अनाथ असल्याचे दु:ख आता दूर हाेईल या आनंदात असतानाच तिचे सुख नियतीलाही पाहवले नसल्याचे १९ जानेवारी सायंकाळी घडलेल्या घटनेवरून समाेर आले. लग्नाची तयारी करीत असतानाच अनुराधाला अनाथाश्रमातच विजेचा झटका लागला आणि काही क्षणातच तिचा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

लहान असतानाच अनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले हाेते. लहानाची माेठी झाली. अनाथ असल्याचे प्रचंड दु:ख असतानाच १८ वर्षाची हाेताच तिला जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली. अनुराधालाही प्रचंड आनंद झाला. आयुष्यातील दु:खाची रात्र ३१ जानेवारी राेजी संपणार व विवाह बंधनात अडकण्याच्या आनंदात असतानाच अनुराधाला अनाथाश्रमामध्ये मंगळवारी सायंकाळी वरच्या माळ्यावर विजेचा धक्का लागला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनुराधाला तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारही सुरू झाले मात्र काही वेळातच अनुराधाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिवा वानरे यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अनुराधाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला. एका अनाथ मुलीशी विवाह करून एक वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न शिवाने केला हाेता. मात्र दाेघांचेही सुख नियतीला पाहवले नाही आणि एका अपघातात अनुराधाचा मृत्यू हाेताच एका संसारवेलीचा सुरुवात हाेण्यापूर्वीच घात झाला.

टॅग्स :AkolaअकोलाelectricityवीजSocialसामाजिक