शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठी इच्छुकांचा जीव टांगणीला

By admin | Updated: January 31, 2017 02:17 IST

उमेदवारी यादी कधी होणार जाहीर; राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष.

अकोला, दि. ३0-शहरात भाजप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा ओढा असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी संबंधित पक्षांकडे दावेदारी केल्यानंतर आपल्या पदरात तिकीट मिळते की नाही, या विचारातून इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिकेकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन चार दिवसांचा अवधी उलटला असताना अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना व भाजप आमने-सामने लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी आजपर्यंत युतीच्या माध्यमातून निवडणूक लढल्यामुळे कोणाची नेमकी ताकद किती, याचा अंदाज लागत नव्हता. यावेळी मात्र दोन्ही पक्षांची ताकद निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल. भाजप-सेनेची युती तुटण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाच्या वल्गना केल्या जात होत्या. युती तुटताच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडीच्या मुद्यावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार २७ जानेवारीपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी मनधरणी चालवली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला चार दिवसांचा कालावधी होत असताना अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली नसल्याचे चित्र आहे. बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी उमेदवारी यादी २ किंवा ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाते की काय, अशी शंका असल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यामध्ये ज्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा विश्‍वास वाटणार्‍या उमेदवारांनी प्रचार सभा घेण्याचा धडाका लावल्याचे दिसून येते. बंडखोरी, दगाफटका टाळण्यासाठी विलंबप्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यातील निवडून येणार्‍या निकषात कोण बसतो, हे निश्‍चित नसल्याने आणि पक्षांतर्गत मतप्रवाह असल्यामुळे भाजप-शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भारिपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत लक्षात घेता त्यापूर्वी उमेदवार यादी घोषित केल्यास बंडखोरी व दगाफटका होण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी यादीला विलंब केला जात असल्याचे दिसून येते. विजयाची खात्री देणार्‍यांचा शोध सुरूचमहापालिकेची निवडणूक यावेळी प्रथमच भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या मुद्यावर वाटाघाटी सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघानेदेखील यंदा कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी न करता निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याने प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत तगडे आव्हान देऊन विजय प्राप्त करणार्‍या उमेदवारावर दाव लावल्या जात आहेत. शहरातील जाती-पातीचे समीकरण लक्षात घेता सर्वच पक्षाकडून विजयाची हमी देणार्‍या उमेदवारांचा अद्यापही शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.अनेक पक्षांकडे मागितली उमेदवारी!भाजप-सेनेची युती तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिपची आघाडी गृहीत धरून काही बहाद्दरांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुलाखतींना हजेरी लावून उमेदवारी मागितली आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याच पक्षाने उमेदवारी यादी जाहीर न केल्यामुळे इच्छुकांची कोंडी झाली आहे.