शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या सकारात्मकतेवर गेज परिवर्तन अवलंबून

By admin | Updated: February 24, 2016 01:38 IST

वन विभागाच्या देहरादून येथील चमूने केली रेल्वे मार्गाची पाहणी.

राम देशपांडे / अकोलादक्षिण मध्यचा मीटरगेज रेल्वेमार्ग मेळघाटातील अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पातून जातो. गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबित असलेला गेज परिवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून वन विभागाच्या केंद्रीय अधिकार्‍यांनी संरक्षित क्षेत्रातून जाणार्‍या रेल्वे मार्गाची डिसेंबर-२0१५ मध्ये पाहणी केली होती. वन विभागाचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असला तरी, पाहणीदरम्यान वनाधिकार्‍यांनी दर्शविलेल्या सकारात्मकतेवर गेज परिवर्तन अवलंबून असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णला दिली. विशेष बाब म्हणजे, या पाहणीचा अहवाल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे याआधीच सादर झाला असल्यास, गुरुवारी संसदेत सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पात ह्यहृदयस्थानाह्णची ही धडधड सर्व देशवासीयांना एकायला मिळणार, हे निश्‍चित.अकोला ते खंडवा या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांंपासून प्रलंबित असला तरी, अकोला ते आकोट, दरम्यान या प्रकल्पास अंशत: चालना मिळाली आहे; मात्र आकोटच्या पुढे वानरोड ते तुकईखेडदरम्यान हा रेल्वेमार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जातो. गेज परिवर्तनानंतर या मार्गावर गाड्यांचे आवागमन वाढणार हे निश्‍चित असल्याने, त्याचा फटका रेल्वेमार्गावर वावरणार्‍या वन्य श्‍वापदाना बसू शकतो. वन विभागाच्या कायद्यात ही बाब मुळीच बसत नसल्याने, वन विभागाने अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनास परवानगी नाकारली. रेल्वे प्रशासनासाठी कळीचा ठरत असलेल्या या बाबीची सखोल माहिती व्हावी म्हणून प्रारंभी स्थानिक रेल्वे अधिकार्‍यांना सोबत स्वत: ट्रॉलीवर स्वर होऊन खासदार संजय धोत्रे यांनी वन विभागातून जाणार्‍या रेल्वे मार्गाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी केंद्रीय वन विभागास पुन्हा नव्याने पाहणी करण्याची विनंती केली. खासदारांच्या या विनंतीस मान देऊन, डिसेंबर २0१५ मध्ये देहरादून येथील वनाधिकारी त्यांच्या चमूसह वन विभागात दाखल झाले होते. या पाहणीदरम्यान वनाधिकर्‍यांनी दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्‍यांसोबत अनेक सकारात्मक मुद्यांवर चर्चा केली. हिरखेड ते तुकईथड या वनपरिक्षेत्राबाहेरून जाणार्‍या पर्यायी मार्गाचा अवलंब न करता, आहे त्याच मार्गाचे गेज परिवर्तन कशा पद्धतीने केले जाऊ शकते, या विविध बाबींवर त्यांनी सकारात्मकता दर्शविली.