शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी स्पर्धकाच्या कुशलेतवर अवलंबून - हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:05 IST

अकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्‍वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला विजय प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे, प्रत्येक खेळाडूने मैदानावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देखासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्‍वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला विजय प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे, प्रत्येक खेळाडूने मैदानावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. केळीवेळी येथे आयोजित खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.   या कार्यक्रमाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, माजीमंत्री वसंतराव धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा मध्यवर्तीचे बॅकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, जगन्नाथ ढोणे, दाळू गुरू जी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ते पुढे म्हणाले, की या गावाला कबड्डीचे आकर्षण असून, अंतिम सामना संपल्यानंतरही प्रेक्षक मैदानावर बसून आहेत. त्यामुळे, ही गर्दी या खेळाच्या यशाचे गमक असून, येथील खेळाडू विश्‍वचषक स्पर्धेत पोहचावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. केळीवेळीची जमीन खेळाडूंसाठी सुपीक आहे, येथे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी सामने घेतले जातात ही अत्यंत भूषणावह बाब आहे. या देशी खेळाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून, आपणही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. खासदार कबड्डी चषकप्राप्त  सर्मथ अमरावती कबड्डी संघ व हरियाणा येथील विजेत्या  संघाला त्यांच्या हस्ते खासदार चषक  प्रदान करण्यात आला. यावेळी विदर्भासह केळीवेळी पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

विजेत्या संघाचा जल्लोष अंतिम सामन्यात विजयी झाल्यांनतर सर्मथ अमरावती पुरू ष व गुरू कुल हरियाणा महिला कबड्डी संघाने एकच जल्लोष केला. यावेळी पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमींनी त्यांना प्रतिसाद दिला.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरKabaddiकबड्डीakotअकोट