शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार महिलेला गणेशाचा आधार!

By admin | Updated: July 26, 2016 01:58 IST

संघर्षगाथा: गणेशमूर्ती निर्मितीतून लावतेय घराला हातभार

अकोला: लाडक्या गणरायाचे आगमन महिनाभरावर येऊन ठेपले आहे. गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्रीतून शेकडो हातांना रोजगार मिळतो. अनेकांना बाप्पाने आधार दिला. असाच आधार अकोल्यातील निराधार महिलेला मिळालेला आहे. गणेश मूर्ती निर्मितीतून ती घरासोबतच मुलीच्या शिक्षणाला हातभार लावत आहे. अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणासमोरील जागेत लता सुरेश श्रृंगारे या महिलेने झोपडी थाटून गणेश मूर्तीच्या निर्मिती कामाला सुरुवात केली. गणेश मूर्ती निर्मितीचा लताबाईंचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या भरवशावरच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चार वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे लताबाई खचली. मुलीचे शिक्षण कसे करावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. पतीसोबत ती गणेश मूर्ती निर्मितीच्या कामात मदत करायची. गणेश मूर्ती घडविण्याचे कौशल्य तिला पतीने शिकविले होते. या कौशल्याचा आधार घेत, लताबाईने नव्या उमेदीने गणेश, शारदा, मूर्ती घडविण्याचे कार्य हाती घेतले. बाजारातून प्लास्टर, कलर, डिस्टेम्बर आणून तिने मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिची लहान मुलगी सध्या इयत्ता दहावीला शिकते आहे. तीही लताबाईला या कामात मदत करते. मोठय़ा मुलीचे लग्न झाले. दोघी मायलेकी झोपडीवजा घरात राहतात. गणेश मूर्ती निर्मितीतून लताबाई मुलीला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने शेकडो गणेश मूर्ती घडविल्या. सध्या गणेश मूर्तींना आकार देण्याचे, रंगरंगोटी करण्याचे काम ती करीत आहे. अवघ्या महिनाभरावर गणरायाचे आगमन येऊन ठेपले. त्यापूर्वी आकर्षक गणेश मूर्ती तयार करून त्या बाजारात पाठविण्यासाठी लताबाईची धडपड सुरू आहे. गणेश मूर्ती निर्मितीचे साहित्य महागल्याने यंदा गणेश मूर्तींंच्या किमतीतही वाढ होणार असल्याचे लताबाईने सांगितले. गणेश मूर्ती घडविण्याच्या कौशल्यामुळे आणि सण-उत्सवामुळे निराधार महिलेला आधार मिळतो आहे. लताबाईचा सुरू असलेला संघर्ष, मुलीला शिकविण्याची धडपड प्रेरणादायी आहे.