शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात विभागीय चौकशी

By admin | Updated: July 7, 2016 02:24 IST

आयुक्त लहाने यांचा निर्णय; सफाई कर्मचा-यांचे धाबे दणाणले.

अकोला: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील तीन महिला सफाई कर्मचार्‍यांनी बनावट आरोग्य प्रमाणपत्र सादर करून सेवानवृत्ती घेतल्याप्रकरणी प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदवली होती. या प्रकरणातील सेवानवृत्त झालेल्या मात्र प्रशासनाने पुन्हा कामावर नियुक्त केलेल्या सफाई कर्मचारी भारती संतोष ढोलकर यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत कर्मचार्‍यांना दुर्धर आजार जडल्यास ऐच्छिक सेवानवृत्ती घेऊन कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तीच्या नियुक्तीची शिफारस प्रशासनाकडे करता येते. सेवानवृत्तीसाठी सक्षम वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या नियमानुसार महिला सफाई कर्मचारी किरण निंदाने, लता रिल व भारती ढोलकर यांनी सेवानवृत्तीचे प्रकरण मनपात सादर केले होते. तीनही कर्मचार्‍यांनी सवरेपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्राबाबत आयुक्तांना शंका आल्याने त्यांनी कर्मचार्‍यांनी सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवले. शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार असे कोणतेही प्रमाणपत्र जिल्हा सवरेपचार रुग्णालयातून देण्यात आले नसल्याचे कळवले. ही गंभीर बाब ध्यानात घेता आयुक्त अजय लहाने यांनी तीनही महिला सफाई कर्मचार्‍यांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे निर्देश सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर यांना दिले होते. घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी रोजी पोलीस तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान, आयुक्त लहाने यांनी भारती ढोलकर या महिला कर्मचार्‍याची सेवानवृत्ती रद्द करून त्यांना पुन्हा कामावर नियुक्त केले. तसेच विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.