शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची झाडाझडती!

By admin | Updated: April 11, 2017 01:50 IST

महापौरांनी घेतला आढावा; गोडाउनमधील औषधसाठा, पुस्तिकेच्या नोंदीत आढळली तफावत.

अकोला: शहरात स्वाइन फ्ल्यू आजाराने उग्र रूप धारण केल्याची जाणीव होताच महापौर विजय अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता मनपाच्या वैद्यकीय आरोग्य व मलेरिया विभागाचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्‍यांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे पाहता महापौरांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. मलेरिया विभागाच्या अखत्यारित असलेल्या गोडाउनची पाहणी केली असता औषधसाठा व पुस्तिकेच्या नोंदीत तफावत आढळून आली. अखेर याप्रकरणी उपायुक्त समाधान सोळंके यांना माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.राज्याच्या विविध भागात डोके वर काढणार्‍या संसर्गजन्य स्वाइन फ्ल्यू आजाराचे लोण आता शहरातही पोहोचल्याचे दिसत आहे. आजपर्यंत शहरात या आजाराचे अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असताना महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी रात्री ९ वाजता तसेच सोमवारी सकाळी ७ वाजता आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सोमवारी सकाळी दक्षिण झोनस्थित मनपाच्या संकुलमध्ये मलेरिया विभागाची आकस्मिक पाहणी केली असता ३२ कर्मचार्‍यांपैकी तब्बल १६ कर्मचारी गैरहजर आढळून आले. तर उर्वरित कर्मचारी उशिरा पोहोचले. शहरात डासांचा प्रकोप वाढला असताना मलेरिया विभागाकडून नियमित फवारणी, धुरळणी होत नसल्याची परिस्थिती आहे. महापौर विजय अग्रवाल यांनी या विभागाच्या गोडाउनची पाहणी केली असता उपलब्ध औषध साठा तसेच साठा पुस्तिकेच्या नोंदवहीत मोठय़ा प्रमाणात तफावत आढळून आली. मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक अरुण टापरे यांनी दिलेली माहिती असंबद्ध असल्याचे समोर येताच महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एकूणच नागरिकांच्या आरोग्याप्रती मनपाचा आरोग्य विभाग कमालीचा उदासीन असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात महापौर अग्रवाल यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा करून मलेरिया विभागाची घडी सुधारण्यासह स्वाइन फ्ल्यू आजाराला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.