शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा पुन्हा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:13 IST

गत महिनाभरात जिल्ह्यात डेंग्युचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परतीच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, त्याचा फटका आरोग्याला बसत आहे. शहरातील अनेक भागात डबके साचल्याने डेंग्यू, चिकुनगुनियाचा धोका पुन्हा वाढला आहे. गत महिनाभरात जिल्ह्यात डेंग्युचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले आहे. डेंग्यू, चिकुनगुनियाचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.सध्या राज्यभरात डेंग्यू, चिकुनगुनियाने थैमान घातले आहे. अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिवाय, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी दवाखाने हाउसफुल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत डेंग्यूच्या प्रसाराचा धोका संभवत असल्याने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत कंटेनर सर्व्हेची विशेष मोहीम राबविण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने मोहिमेचा कालावधी दोन आठवडे वाढविण्यात आला आहे.

कंटेनर सर्व्हे आणखी १५ दिवसपरतीचा पाऊस लांबल्याने जिल्हा हिवताप विभागातर्फे कंटेनर सर्व्हेचा कालावधी आणखी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात यापूर्वी ज्या ज्या भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले, अशा ठिकाणी घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या भांड्यांची पाहणी केली जाणार आहे, तसेच परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी केली जाईल.

जिल्ह्यात कंटेनर सर्व्हेच्या मोहिमेचा कालावधीही वाढविला आहे. नोव्हेंबर महिन्यातील दोन आठवडे जिल्ह्यातील डेंग्यूसदृश भागात सर्व्हे करण्यात येणार आहे; मात्र नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdengueडेंग्यू