शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डेमोसाईल क्रेन पक्ष्याचे अकोल्यात आगमन

By admin | Updated: January 29, 2015 01:12 IST

पक्षीमित्रांना स्थलातंरीत पक्षी निरीक्षणाची अपुर्व संधी.

अकोला- जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठय़ाप्रमाणावर आगमन होत आहे. यात डेमोसाईल क्रेन पक्ष्याचाही समावेश आहे. हा पक्षी दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस जिल्ह्यात येतो. गत दोन वर्षांपासून मात्र या पक्ष्याचे अकोला जिल्ह्यात दर्शन झाले नव्हते. यावर्षी मोठय़ाप्रमाणावर डेमोसाईल क्रेनचे जिल्ह्यात आगमन झाले असल्याचे मंगळवारी पक्षीमित्रांना पक्षी निरीक्षणादरम्यान आढळून आले. अकोला जिल्ह्यात दरवर्षी युरोप आणि अन्य प्रदेशातून स्थलांतरित पक्षी मोठय़ाप्रमाणावर येतात. यात प्रामुख्याने डेमोसाईल क्रेन या पक्ष्याचा समावेश आहे. या पक्ष्याचे अकोला जिल्ह्यात मोठय़ाप्रमाणावर आगमन होते. गत दोन वर्षांंत मात्र पक्षी निरीक्षकांना जिल्ह्यात हा पक्षी आढळून आला नव्हता. डेमोसाईल क्रेन पक्ष्याने ग्लोबल वार्मिंंगमुळे स्थलांतराचा काळ बदला आणि स्थळही बदल्याचे बोलले जात होते. दोन वर्षांंच्या खंडानंतर यावर्षी मात्र हा पक्षी जिल्ह्यात मोठय़ाप्रमाणावर आढळून आला आहे. पक्षीनिरीक्षक लक्ष्मीशंकर यादव आणि प्रा. मनीष शेटे यांनी मंगळवारी कापशी, महान आणि सिसा मासा परिसरात केलेल्या पक्षीनिरीक्षणादरम्यान त्यांना डेमोसाईल क्रेन पक्षी मोठय़ाप्रमाणावर आढळून आलेत. हा पक्षी ८५ ते १00 सेंटीमीटर लांबीचा असून, रंग पांढरा आणि तोंड काळे असते. स्थलांतर काळात २६ हजार फूट उंचीवरून उड्डाण करतो. या पक्ष्याचे भारतात खैबर खिंडी मार्गे आगमन होते. या पक्ष्याचा उल्लेख रामायणातही आढळून येतो. हा पक्षी शेती आणि मोठय़ा तलावांजवळ आढळून येतो. या पक्ष्याचे वास्तव युरोप खंड, रशिया व पूर्व आफ्रिकेत आढळून येत असल्याची माहिती यादव व शेटे यांनी दिली.