शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अकोल्यात शनिवार ठरला आंदोलन वार; मोर्चा, निदर्शनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 19:28 IST

अकोला : जिल्हाभरातीलविविध शिक्षक संघटना संलग्नीत शिक्षण समन्वय समितीतर्फे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिक्षण बचाव’ मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षक संघटना, आशा स्वयंसेविका, कृषी विद्यापीठ कर्मचाºयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अकोला : जिल्हाभरातीलविविध शिक्षक संघटना संलग्नीत शिक्षण समन्वय समितीतर्फे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिक्षण बचाव’ मोर्चा काढण्यात आला. तसेच आशा स्वयंसेविका व कृषी विद्यापीठ कर्मचाºयांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यामुळे शनिवार आंदोलन वार ठरला.सर्व विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षणाचे बाजारीकरण रोखावे, शिक्षकांवर लादलेल्या आॅनलाइन कामासह अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत, यासाठी विविध शिक्षक संघटना संलग्नित शिक्षण समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी स्वराज्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला.शासनाने २३ आॅक्टोबर २०१७ चा आदेश रद्द करावा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यानंतर सेवेत आलेल्यांनासुध्दा जूनी पेंशन योजना लागू करावी, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिकची यादी घोषीत करुन तुकड्यांसह त्यांना त्वरित बंद करावे, विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबवावी, शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना पायाभूत सुविधा घ्याव्यात, आॅनलाइन कामासाठी पदनिर्मिती करुन स्वतंत्र व्यवस्था करावी, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, महाविद्यालयांना मान्यता बंद करा, यासह विविध मागण्यांसाठी शिक्षण समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, सचिव डॉ. अविनाश बोेर्डे, उपाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्यासह समन्वय समिती सदस्यांनी केले. याप्रसंगी संस्था संघटनेचे अध्यक्ष विजय कौसल, सचिव अ‍ॅड. विलास वखरे, जयदिप सोनखासकर, नरेंद्र गुल्हाणे, नरेंद्र लखाड, साबिर कलाम, प्रकाश डवले, प्रवीण ढोणे, प्रदीप थोरात, गजेंद्र काळे, बाळकृष्ण गावंडे, आशिष चवथे, मो.फारूक, मनिष गावंडे, रजनिश ठाकरे, संजय आगाशे, चंद्रशेखर म्हैसने, नितीन मुळतकर, गोकूल गावंडे, बळिराम झामरे, प्रेमकुमार सानप, गजानन चौधरी, एन.एस.तायडे, पद्मावती टिकार, दिलिप कडू, संदिप बाहेकर, रवी केतकर, राजेंद्र जलमकर, दिनकर गायकवाड, विलास खुमकर, राजेंद्र पातोंड, निरंजन बोचरे, शेख मुख्तारभाई, गणेश वानखडे, कल्पना धोत्रे, संतोष अहिर, डि.एस.राठोड, अशोक भराड, श्रीराम पालकर, संजय मईम, संजय देशमुख, प्रशांत डोईफोडे, विठ्ठल पवार, श्रीकृष्ण गावंडे, माया कोरपे, उज्वला हिवसे, मंजू घाटे, निलिमा घाटे, संगिता निचळे, छाया बिजवाडे, शेख हसन कमानवाले उपस्थित होते, असे विजय ठोकळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

आशा स्वयंसेविकांना सुविधा द्या आशा स्वयंसेविकांना अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन आणि इतर सुविधा देण्याच्या मागणीसाठी क्रांती आशा विकास फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. आशांना कामावर आधारित वेतनाऐवजी मासिक वेतन पद्धत लागून करावी, दरवर्षी दोन साड्या द्याव्या, बीपीएल कार्ड देऊन सवलत द्यावी, जिल्हा स्त्री रुग्णालयात विश्रामकक्ष द्यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण आणल्यास तातडीने प्रमाणपत्र द्यावे, विनामोबदला अतिरिक्त काम देऊ नये, दिल्यास त्याचा मोबदला द्यावा, राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचा मोबदला दरमहा द्यावा, गटप्रवर्तकांना अंगणवाडी पर्यवेक्षिकेप्रमाणे सुविधा द्याव्या, महापालिकेत गटप्रवर्तक पद मंजूर करावे, आशाच्या परिवाराला मोफत आरोग्य सेवा द्यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर