शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही आघाडीला सुरुंग!

By admin | Updated: April 22, 2017 01:11 IST

भारिप-बमसं घेणार काडीमोड; मनपातील राजकारणाला कलाटणी.

अकोला : स्थायी समितीसह स्वीकृत सदस्य पदासाठी पक्षातील नगरसेवक, कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, या उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेसने गठित केलेल्या लोकशाही आघाडीला भारिप-बहुजन महासंघाने सुरुंग लावला असून, लोकशाही आघाडीपासून काडीमोड घेण्याची पूर्ण तयारी भारिपने केल्याची माहिती आहे. भारिपचे तीन नगरसेवक आघाडीतून बाहेर पडल्यास स्वीकृत सदस्य पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍याच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या जाण्याची दाट शक्यता आहे.महापालिक ा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे पाच नगरसेवक स्वबळावर निवडून आले. स्थायी समिती तसेच स्वीकृत सदस्य पदावर पक्षातील कार्यकर्त्याची निवड व्हावी, यासाठी अपेक्षित संख्याबळ जुळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन एकूण नऊ सदस्यांची लोकशाही आघाडी गठित केली. राकाँच्या गटनेतापदी शीतल गायकवाड यांची नियुक्ती केली. लोकशाही आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता स्थायी समितीमध्ये दोन सदस्यांची निवड करण्यासाठी एक सदस्य राष्ट्रवादीचा व दुसरा एक सदस्य भारिपचा पाठविण्यावर दोन्ही पक्षात सहमती झाली होती. स्थायी समिती सदस्यांची निवड झाली, त्या दिवशी राकाँने सादर केलेल्या लिफाफ्यातून भारिपच्या अँड. धनश्री देव यांचे नाव वगळण्यात आले. या प्रकारावर अँड. देव यांनी नाराजी व्यक्त करून आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले. या सर्व प्रकाराची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांना दिल्यानंतर त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा आदेश दिल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी भारिप-बमसंच्या गटनेत्या अँड. धनश्री देव, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे यांच्या स्वाक्षरी घेण्यावर काथ्याकुट सुरू असल्याची माहिती आहे.