शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले असून, या अकाउंटवरून मॅसेंजरद्वारे अनेकांना पैशांची मागणी झाली. ...

अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले असून, या अकाउंटवरून मॅसेंजरद्वारे अनेकांना पैशांची मागणी झाली. माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे पुत्र अखिलेश हातवळणे यांना शुक्रवारी रात्री पापळकर यांच्या बनावट अकाउंटवरून मेसेज गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हॅकरने हातवळणे यांना तातडीने १२ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगून, ऑनलाइन पैसे खात्यात वळते करण्याची विनंती केली. काहीतरी गौडबंगाल असल्याचे लक्षात येताच, अखिलेश हातवळणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांना माहिती दिली. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.

अनेकांना पाठविल्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’

फेसबुकवर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या ‘Jitendra Papalkar’ या नावाने फेसबुक अकाउंट आहे. याच नावाने हॅकर्सनी बनावट अकाउंट तयार केले. काल संध्याकाळनंतर अकोल्यातील काही प्रतिष्ठित मंडळींना या बनावट अकाउंटवरून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुभाष गादिया, अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा मुलगा अखिलेश यांच्यासह १२ ते १३ जणांना अशा रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या आहेत. या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या अकाउंटवरून मराठीत चॅटिंग सुरू करण्यात आले. आपण सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असून, आपल्याला अतिशय तातडीने १२ हजार रुपयांची आवश्यकता आहे, हे पैसे लवकरच परत करणार असल्याचे या चॅटिंगमध्ये म्हटले गेले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सर्वांच्याच लक्षात आल्याने कुणीच पैशांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

धागेदोरे राजस्थानपर्यंत

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसांकडे केली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या सायबर शाखेकडे सोपविला आहे. बनावट अकाउंट तयार करणाऱ्या हॅकर्सनी यासंदर्भात चॅटिंग करताना ‘गुगल पे’ आणि ‘पेटीएम’चे अकाउंट नंबर दिले आहेत. यात ‘गुगल पे’साठी 9728937247 हा क्रमांक देण्यात आला आहे, तर ‘पेटीएम’ अकाउंटसाठी 918059934406 हा क्रमांक देण्यात आला असून, त्यासाठी ‘आयएफएससी कोड’ 0123456 हा देण्यात आला आहे. हे दोन्ही क्रमांक राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून संचालित होत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.