पातूर : शहरात दिवसंेदिवस वाढत असलेली वाहतूक पाहता त्यामुळे निर्माण होणार्या विविध समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उड्डाण पूल किंवा बायपास रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पातूर शहरातून पातूर-बाळापूर आणि वाशिम-अक ोला हे दोन मार्ग जातात. पातूर-बाळापूर मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. वाशिम-अकोला मार्गावर तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, साईबाबा विद्यालय, शाहबाबू हायस्कूल, जुने बसस्थानक, तुळसाबाई कावल विद्यालय, नवीन बसस्थानक, डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय अशा काही शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांसह नागरिकांची वस्ती आहे. वाशिम-पातूर-बाळापूर हा मार्ग मुंबई-हैदराबाद, दिल्ली, इंदूर-हैदराबाद या मार्गांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून दुचाकींसह मोठमोठी वाहने, कंटेनर, सहा ते २०-२२ चाकी ट्रक धावतात. या मार्गावर मुख्य बाजारपेठ, नागरीवस्ती, तीन शाळा, नगर परिषद कार्यालय असल्याने पायी चालणार्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मार्गावरील वाहनांच्या गर्दीमुळे पायी चालणार्यांना जीव मुुठीत घेऊनच चालावे लागते. या मार्गावर अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. त्याचप्रमाणे वाशिम-अक ोला मार्गावरही वाहनांची मोठी वर्दळ झाली आहे. जुन्या बसस्थानक चौकातून बाळापूर, तसेच अक ोल्याकडे जाणार्या दोन्ही मार्गांवर तर वाहनांच्या गर्दीमुळे पायी चालणार्यांची चांगलीच तारांबळ उडते. जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक कमी करून इतरत्र वळविण्यासाठी येथे नवीन बायपास किंवा उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पातुरात उड्डाणपूलाची मागणी
By admin | Updated: May 15, 2014 19:29 IST