शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी) च्या कंपोझिशन स्कीमचा लाभ घेण्यासाठी १६ ऑगस्ट शेवटी तारीख दिली गेली होती. मात्र, बुधवारी जीएसटीचे पोर्टल सर्व्हर अनेकदा डाउन असल्याने या सेवेपासून अनेकजण वंचित राहिलेत. त्यामुळे जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी अकोल्यातून होत आहे.  जुलैपासून देशभरात जीएसटी ...

ठळक मुद्देपोर्टल सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे अनेक जण सेवेपासून वंचितकंपोझिशन स्कीमचा लाभ घेण्यासाठी १६ ऑगस्ट शेवटी तारीख दिली गेली होती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी) च्या कंपोझिशन स्कीमचा लाभ घेण्यासाठी १६ ऑगस्ट शेवटी तारीख दिली गेली होती. मात्र, बुधवारी जीएसटीचे पोर्टल सर्व्हर अनेकदा डाउन असल्याने या सेवेपासून अनेकजण वंचित राहिलेत. त्यामुळे जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी अकोल्यातून होत आहे.  जुलैपासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. विविध स्लबनुसार विविध व्यापारी-उद्योजकांना वस्तू आणि सेवेवर कर लावला गेला. ऑगस्टमध्ये रिटर्न फाईल करण्याच्या तारखा दिल्या गेल्यात. काहींनी रिटर्न फाईलही केलेत. जीएसटी पोर्टलचे सर्व्हर डाउन असल्याने अनेकांना त्रास झाला. दरम्यान, ज्यांना रिटर्न नको असेल, अशासाठी जीएसटीने कंपोझिशन स्कीम तयार केली होती. मात्र, त्यासाठी १६ ऑगस्टपर्यंंंत नोंद आवश्यक होती. अनेकांनी या स्कीमचा फायदा घेतला. मात्र, अनेकांची नोंद सर्व्हर डाउन असल्याने झाली नाही. त्यामुळे जीएसटी अधिकार्‍यांकडे तक्रारी आल्यात. मात्र, या प्रकरणी स्थानिक पातळीवर काहीएक अधिकार नसल्याने त्यांना ऑनलाइन तक्रार करण्याचे सांगितले. आता जीएसटी परिषद काय निर्णय घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. कंपोझिशन स्कीमची तारीख पुन्हा नव्याने वाढून मिळावी, अशी मागणी कर सल्लागार आणि उद्योजकांनी केली आहे.

जीएसटी परिषदेने कंपोझिशन स्कीमचा कार्यक्रम दिला होता. त्यामुळे या स्कीमला मुदत वाढ देण्याचा निर्णय परिषदेचाच राखून आहे. देशभरातील व्यावसायिक जर वंचित राहिले असतील, तर परिषद त्याबाबत विचार करू शकेल.-सुरेश शेंडगे, उपायुक्त, जीएसटी अकोला.