आकोट : आकोट-अकोला मार्गावरील गांधीग्राम येथे पूर्णा नदीचे पाणी आणण्याकरिता तसेच शिवाला जलाभिषेक करण्याकरिता पंचक्रोशीतील हजारे शिवभक्त एकत्र येत असल्याने येथे अपघाताची शक्यता ध्यानात घेता घाट बांधण्याची मागणी केली आहे. श्रावणमास कावड उत्सव समितीने केली आहे.श्रावणमासानिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे दोन्ही काठ शिवभक्तांनी फुलून गेलेले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर जलाभिषेक करून पूर्णेचे पाणी कावडीद्वारे नेणार्यांची या ठिकाणी रीघ लागलेली असते. परंतु या ठिकाणी नदीकाळी निसरडा भाग मोठ्या प्रमाणात असल्याने शिवभक्तांना या दोन्ही क्रिया करणे फार जिकीरीचे व धोक्याचे जाते. अकोला भागाकडे या नदीकाठाची थोडीफार बरी स्थिती आहे. परंतु आकोटकडचा नदीकाठ अत्यंत अडचणीचा आहे. अकोला भागाकडून आलेल्या हजारो शिवभक्तांची त्या काठावर प्रचंड गर्दी असल्याने त्या काठावर प्रचंड झुंबड होते. त्यामुळे पाणी घेण्याच्या चढाओढीत अपघातही होतात. हे टाळण्यासाठी आकोटच्या दिशेकडील नदीकाठावर सिमेंट घाट बांधल्यास शिवभक्तांची मोठी सोय तर होईलच परंतु अपघातही टाळता येऊ शकतात. त्यामुळे पूर्णा नदीच्या आकोटकडील काठावर त्वरित सिमेंअ घाट बांधून द्यावा, अशी मागणी श्रावणमास कावड उत्सव समिती आकोट यांनी केली आहे. (प्रतिनिधी).....
गांधीग्राम येथे घाट बांधण्याची मागणी
By admin | Updated: August 21, 2014 19:37 IST