शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यास बंदीची मागणी

By admin | Updated: August 9, 2014 22:42 IST

विद्यार्थी, युवक आक्रमक : जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

वाशिम : शहरात ठिकठिकाणी अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यात येत असल्यामुळे विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरूणपीढीवर विपरित परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता शहरात अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यास बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात विद्यार्थी आणि युवकांच्यावतीने मानवाधिकार संरक्षण संस्था, वाशिम यांच्याकडून ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. काळानुसार तरूण पीढीचे आचार विचार बदलत आहेत. त्यातच प्रगत तंत्रज्ञानामुळे परंपरागत चालीरिती आणि संस्कृतीचे हनन होत आहे. बदलत्या चालीरितींचा विपरित परिणाम तरूणपीढींवर होत आहे. त्यामुळे बलात्कार, विनयभंग् आदि गुन्हय़ांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अलिकडच्या काळात सर्रासपणे प्रदर्शित करण्यात येणार्‍या अश्लील चित्रपटांचीही तरूण पीढीवर वाईट परिणाम होण्यास महत्त्वाची भूमिका आहे. काही व्यावसायिक चित्रपटातील अंगप्रदर्शनही तरूणपीढीला बिघडविण्यात कारणीभूत आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात येत असलेल्या अश्लील चित्रपटांच्या फलकांमुळेही तरूणांचे विचार वाईटमार्गाने जात आहेत. त्यामुळे ते वाईटमार्गांचा अवलंब करून आपले चारित्र्य बिघडवित आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन शहरात अश्लील चित्रपटांचे फलक लावण्याची बंदी घालावी, असे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मानवाधिकार संरक्षण संस्था, वाशिमचे सचिव रामेश्‍वर बाजड यांच्यासह शहरातील अनेक युवक, विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.