शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान जनजागृतीसाठी दिल्लीचा तरुण ५७०० किमीची पदयात्रा करत पोहोचला अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 10:59 IST

Delhi youth reached Akola by walking 5700 km: या तरुणाने येत्या दोन वर्षांत २१ हजार किलोमीटर प्रवास करत दिल्लीला पोहोचण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देतिरुवनंतपूरमपासून सुरू केला प्रवास  २१ हजार किलोमीटर पायी चालण्याचा संकल्प

- अतुल जयस्वाल

अकोला : केवळ रक्त न मिळाल्याने कोणाचा मृत्यू होता कामा नये, यासाठी रक्तदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने केरळ राज्यातील तिरवनंतपूरम येथून २८ डिसेंबर २०२१ पासून पदयात्रेस सुरुवात केलेला दिल्ली येथील किरण वर्मा नामक ३७ वर्षीय अवलीया तब्बल ५७०० किलोमीटरचा पायी प्रवास करत मंगळवारी (२६ जुलै) अकोल्यात पोहोचला. थंडी, ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता पदभ्रमंतीवर असलेल्या या तरुणाने येत्या दोन वर्षांत २१ हजार किलोमीटर प्रवास करत दिल्लीला पोहोचण्याचा संकल्प केला आहे.

दिल्ली येथील एका मोठ्या शिक्षण समूहातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून २०१६ पासून रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या किरण वर्मा यांनी 'चेंज विथ वन फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेंतर्गत 'सिंपली ब्लड' व 'चेंज विथ वन मिल' हे दोन उपक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात गत दोन वर्षांपासून देशात ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण घटले असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी लोकांना रक्तदानाप्रती जागृत करण्याच्या उद्देशाने किरण वर्मा यांनी २८ डिसेंबर २०२१ पासून केरळ राज्यातील तिरवनंतपूरम येथून पदयात्रेस प्रारंभ केला. आतापर्यंत त्यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील तसेच पुदुच्चेरी व दिव-दमन या केंद्रशासित प्रदेशांमधील ७२ जिल्ह्यांमधून पायी प्रवास केला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव व बुलडाणा असा प्रवास करत ते २६ जुलै रोजी अकोला येथे आले. येथे त्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली व २७ जुलै रोजी ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. येथून ते अमरावती, नागपूर व इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये वर्मा यांनी १६००० किमीचा प्रवास केला होता. यापैकी ६००० किमीचा प्रवास पायी केला होता.

पायाला दुखापत, तरीही पदयात्रा

पदयात्रा सुरू असताना किरण वर्मा यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीवर किरकोळ उपचार करून व पायातील जोड्यांमध्ये थोडा बदल करून ते पायी प्रवास करत आहेत. अकोल्यातून अमरावतीकडे रवाना होताना शिवरजवळ दुखापत वाढल्याने किरण वर्मा बसने अमरावतीपर्यंत गेले. तेथे उपचार केल्यानंतर एक दिवसाची विश्रांती घेऊन पुढील पदयात्रा करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

...म्हणून झोकले रक्तदान चळवळीत

किरण वर्मा यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील एका रुग्णासाठी डोनर म्हणून रक्त दिले होते. त्यांनी मोफत दिलेल्या रक्तासाठी एका मध्यस्थाने त्या रुग्णाकडून १५०० रुपये वसूल केले. वैद्यकीय बिल भरण्यासाठी त्या रुग्णाच्या पत्नीला देहविक्रय करावा लागल्याची माहिती किरण वर्मा यांना मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्याच दिवशी त्यांनी नोकरी सोडली व वर्ष २०२५ पर्यंत देशात रक्ताअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी कार्य करण्याचे ध्येय निश्चित केले.

पदयात्रे दरम्यान ४२ रक्तदान शिबिरे

किरण वर्मा यांनी पदयात्रा सुरू केल्यापासून त्यांच्या समर्थनार्थ आतापर्यंत विविध ठिकाणी ४२ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये ६५५६ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी पदयात्रेदरम्यान १५०० रक्तदात्यांची फळी उभी केली असून, या दात्यांनी विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान केले आहे.

आपल्या देशात दररोज हजारो रुग्णांना रक्ताची गरज भासते, परंतु सर्वांनाच रक्त मिळतेच असे नाही. रक्तदानासाठी स्वेच्छेने लोक पुढे आले तर देशात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही व कोणालाही रक्ताअभावी प्राण गमवावे लागणार नाहीत.

- किरण वर्मा, प्रणेता, 'चेंज विथ वन फाउंडेशन', नवी दिल्ली

टॅग्स :AkolaअकोलाNew Delhiनवी दिल्ली