शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब नमुने घेण्यात दिरंगाई; अहवालही लवकर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:46 IST

अनेक संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे.

अकोला : विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या अकोल्यात आरोग्य विभाग व प्रशासकीय स्तरावरून कोरोना संसर्ग तपासणी व उपचारात तत्परता अपेक्षित असताना, अनेक संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे स्वॅब घेतलेल्या संदिग्धांचे चाचणी अहवालही लवकर मिळत नसल्याने संदिग्धांना कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागत असल्याने या रुग्णांची त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल होत आहे. जिल्हा प्रशासन व सर्वोपचार रुग्णालयाकडून या समस्येचे निराकारण होत नसल्याने चित्र आहे.अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १०४१ झाला असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३० आहे. मृतकांचाही आकडा ५३ झाला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने संदिग्ध रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचे दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्धांना सर्वोपचार रुग्णालय, कोविड केअर सेंटर व खासगी हॉटेलमध्ये ठेवले जात आहे. या ठिकाणी मुक्कामी असलेल्या संदिग्ध रुग्णांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. दुसरीकडे स्वॅब नमुने घेतल्यानंतर २४ तासात अहवाल येणे अपेक्षित आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. संदिग्ध रुग्णांना या ठिकाणी क्वारंटीन केल्यानंतर पाच ते सहा दिवसांपर्यंत नमुनेच घेतले जात नाहीत. स्वॅब घेतल्यानंतरही तीन ते चार दिवस अहवाल मिळत नसल्याने संदिग्ध रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल होत आहे.पाच दिवसानंतर घेतले नमुनेसिंधी कॅम्पस्थित एका कुटुंबातातील दोघांसह अन्य काही संदिग्ध शहरातील एका हॉटेलमध्ये क्वारंटिन आहेत. पाच दिवस क्वारंटीन राहिल्यानंतर सोमवारी त्यांचे नमुने घेण्यात आले. दुसरीकडे गुलजारपुरा भागातील एक संदिग्ध रुग्ण शनिवारपासून सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २१ मध्ये आहे. सदर रुग्णाचे नमुने त्याच दिवशी घेतल्या गेले; परंतु दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या रुग्णाचा अहवाल मिळाला नाही.कोरोना संकटावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन व सर्वोपचार रुग्णालयाकडून सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये दिरंगाई होण्याची शक्यता नाकारताही येत नाही; मात्र स्वॅब नमुने हे पाच दिवसानंतरच घेतले जात आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल योग्य प्राप्त व्हावा, यासाठी तसे केले जात आहे. संदिग्ध रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.- नरेंद्र लोणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अकोला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला