शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना मिळताहेत तारखांवर तारखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:52 IST

दिव्यांगांना डॉक्टरांकडून पुढची तारीख दिली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला.

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यावर दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येते. दिलेल्या तारखेनुसार वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या दिव्यांगांना डॉक्टरांकडून पुढची तारीख दिली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला.अकोल्यातील मोहम्मद अली चौकातील पिंजारी गल्ली येथील रहिवासी राशीद अहमद यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी एप्रिल महिन्यात आॅनलाइन अर्ज भरला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवार, २२ नोव्हेंबरचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आणले; पण येथे डॉक्टरच उपस्थित नसल्याने त्यांची पंचाईत झाली. काही वेळाने एक डॉक्टर आले व त्यांनी २७ जुलै २०२० ही पुढची तारीख देऊन काढता पाय घेतला. रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. याप्रकरणी राशीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.वैद्यकीय तपासणीसाठी आठ महिन्यांची प्रतीक्षामनोविकृती विभागातील डॉक्टरांनी दिव्यांग राशीद अहमद यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना पुढील तपासणीसाठी थेट २७ जुलै २०२० चा दिवस दिला आहे. त्यामुळे राशीद यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.बेमुदत उपोषणाचा इशारावैद्यकीय तपासणीसाठी गेलेले दिव्यांग राशीद अहमद यांना थेट आठ महिन्यांनी पुढील तपासणीसाठी बोलाविण्यात आल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय