शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामात दिरंगाई; दोन कोतवाल निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:22 IST

म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांना निलंबित करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याने अकोला तालुक्यातील म्हैसांग व लोणाग्रा येथील दोन कोतवालांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी सोमवारी दिला.विधानसभा निवडणुकीत अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांची अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकविषयक कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय मुद्रणालयातून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या छापील मतपत्रिका प्राप्त करून आणण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात कोतवाल तथागत गवई व नितीन चंदन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी वारंवार सूचना देऊनही छापील मतपत्रिका आणण्याच्या कामाकरिता दोन्ही कोतवाल उपस्थित झाले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली; परंतु विहित मुदतीत नोटीसचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले नाही. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याने, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी १४ आॅक्टोबर रोजी दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकRevenue Departmentमहसूल विभाग