शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीबीटी पोर्टल’व्दारे शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास विलंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:56 IST

अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी पोर्टल) व्दारे राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी पोर्टल) व्दारे राज्यातील विद्यार्थ्यांचे ‘आॅनलाईन’ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी ‘डीबीटी पोर्टल’व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास विलंब झाल्याने, यंदा दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची आशा मावळली आहे.अनुसूचित जाती. विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजे-एनटी) व इतर मागासवर्गीय (ओबीसी ) इत्यादी प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर (जुलैपासून ) विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतात; परंतू, सन २०१८-१९ यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, ‘डीबीटी पोर्टल’मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. गत आठवडाभरापासून शासनाच्या ‘डीबीटी पोर्टल‘व्दारे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्याचे काम प्रायोगित तत्वावर सुरु करण्यात आले असले तरी, शिष्यवृत्तीसाठी ‘डीबीटी पोर्टल ’ व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या कामास विलंब झाल्याने, यंदा दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याची आशा मावळली आहे.सन २०१८-१९ या वर्षातील शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या ‘डीबीटी पोर्टल’व्दारे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याचे काम प्रायोगिक तत्वावर गत आठवडाभरापासून सुरु करण्यात आले आहे.-अमोल यावलीकरसहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्ती