शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पराभव अन विजयाच्या अफवेने उमेदवारांची घालमेल !

By admin | Updated: February 24, 2017 02:49 IST

उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींनी उत्साहाच्या भरात केलेली आकडेमोड चुकीची ठरल्याने उमेदवारांचा जय-पराजयाबाबत अफवा शहरभर पसरली.

अकोला, दि. २३- महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया गुरुवारी खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे पार पडली. यावेळी उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींनी उत्साहाच्या भरात केलेली आकडेमोड चुकीची ठरल्याने उमेदवारांचा जय-पराजयाबाबत अफवा शहरभर पसरली. या प्रकारामुळे उमेदवारांची प्रचंड घालमेल झाली. तर अधिकार्‍यांचीही तारांबळ उडाली होती. मनपाच्या निवडणूक विभागाने यासाठी जय्यत तयारी केली होती. प्रभाग पुनर्रचनेदरम्यान २0 प्रभाग उदयास आले. प्रभागांची संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने एका झोन अंतर्गत चार प्रभाग यानुसार पाच झोनचे गठन करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती केली. मतमोजणीच्या दिवशी झोननिहाय प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना मतमोजणीला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. यांचा उडाला गोंधळप्रभाग १२ मधील उमेदवार काँग्रेसच्या उषा विरक अवघ्या २७ मतांनी पराभूत होऊन भाजपच्या शीतलबेन रूपारेल विजयी झाल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. प्रभाग १९ मधील भाजपचे उमेदवार संजय बडोणे १९२ मतांनी पराभूत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज गावंडे विजयी झाल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरली. प्रभाग १६ मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनेल विजयी झाल्याची माहिती मिळताच काही क्षणासाठी विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रभाग १४ मधील शिवसेना उमेदवार मंगेश काळे ५३ मतांनी पराभूत झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रभागातील उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली असता ही सर्व माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले.