शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद अकरण्यात आले ...

डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद अकरण्यात आले असून बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची तीव्रता दिसून येत नाही, मात्र, परिस्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मागील पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात कोविडचे ३९५ रुग्ण आढळून आले. या कालावधीत काही दिवस वगळल्यास पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून आले. या कालावधीत २५ व २६ जानेवारी, तसेच १ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. इतर दिवशी मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.

गत १५ दिवसांतील स्थिती

दिवस - पॉझिटिव्ह - डिस्चार्ज - मृत्यू ६ फेब्रु. ४० - ११

५ फेब्रु. ४४ - ०७

४ फेब्रु. २१ - २२

३ फेब्रु. २२ - १९ - १

२ फेब्रु. २७ - १४

१ फेब्रु. १४ - ३६

३१ जाने. ५५ - १७ - १

३० जाने. ३३ - ३४

२९ जाने. ३७ - ३

२८ जाने. ४६ - ३२

२७ जाने. २४ - २१ -१

२६ जाने. १९ - २७

२५ जाने. १३ - २८ - २

मृत्यूच्या आकड्यांवर नियंत्रण

मागील पंधरा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली, तरी मृत्यूचा आकडा नियंत्रणात असल्याचे दिसून आले. या कालावधीत पाच जणांना जीव गमवावा लागला असून दिवाळीपूर्वी ही स्थिती चिंताजनक होती. अकोलेकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकरी करून चालणार नाही. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, नियमित मास्कचा वापर करावा, स्वच्छ हात धुवावे, इतरांपासून सुरक्षित अंतर राखावे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ