शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या उत्पादनात घट; शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तत्काळ दखल घेऊन पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात तुरीचे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील चोंढी, चारमोळी, पिंपळडोळी शिवारात तूर सोंगणीला सुरुवात झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा तुरीचे एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तूर पिकापासून भरपूर उत्‍पादन मिळते. त्‍यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्‍हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होत असल्याने तुरीचे पीकही आता न परवडणारे झाले आहे. यंदा परतीचा पाऊस व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीला आलेली फुले झडून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनात घट झाल्याने खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)

---------------------------------

मूग, उडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने तुरीवर आशा होती. मात्र, तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. खर्च परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोंगणीच केली नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा.

- पंडीत देवकते, शेतकरी, पांढुर्णा