शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दिसं जातीलं.. दिसं येतीलं..

By admin | Updated: September 17, 2014 02:31 IST

पोटच्या मुलांनी फिरवली पाठ, वृद्ध दांपत्याचा जीवनसंघर्ष.

राम देशपांडे / अकोलादिवसभर पोत गाठायचे काम करून आपल्या कुटुंबाचा कसातरी उदरनिर्वाह भागविला जातो; मात्र हे करीत असताना मोठा संघर्ष करावा लागतो. हे उद्गार आहेत ४0 वर्षांपासून पोत गाठण्याचे काम करणार्‍या जव्हेरी या वृद्ध दांपत्याचे. हरिहरपेठेते राहणार्‍या या वृद्ध दांपत्याने याच व्यवसायाच्या जोरावर आपल्या मुलांना उंच उडण्याचे बळ दिले; मात्र नोकरी आणि स्वकुटुंबात रममाण झालेल्या मुलांना आई-वडिलांकडे लक्ष देण्यास आता वेळ उरलेला नाही. पुण्याला स्थायिक झालेल्या दोन्ही मुलांनी कर्तव्यापासून पाठ फिरविली असली तरी, आम्ही अद्याप हार मानलेली नसल्याचे ते सांगतात. परिणामी, उतरत्या काळात जव्हेरी दांपत्यावर आहे त्याच व्यवसायावर पोट भरण्याची पाळी आली आहे. अकोला शहरात सराफा बाजाराव्यतिरिक्त गांधी रोडवरदेखील मोठय़ा प्रमाणात सराफा व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांमधून विविध अलंकारांसह सौभाग्याच्या अलंकारांमध्ये ओवण्यासाठी सोन्या-चांदीचे मणीदेखील खरेदी केले जातात. गांधी रोडवरील शनी मंदिरासमोर पोत विणण्याचे काम करणार्‍या या वृद्ध दांपत्याकडे सौभाग्य लेणे गठविण्यासाठी अनेक जण येतात. सराफा व्यावसायिकांकडे वस्तू खरेदी करताना कुठलाही भाव न करणारे ग्राहक, पोत गाठविण्यासाठी घासाघीस करीत असल्याने अक्षरश: सकाळी दहा वाजतापासून ते सायंकाळी सा त-आठपर्यंत ५0 ते १00 रुपयांपर्यंत जेमतेम मजुरी मिळते. त्यातच पितृपक्ष सुरू असल्याने सोन्या- चांदीची खरेदीदेखील मंदावली असल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. वृद्धत्वामुळे डोळे साथ देत नसले तरी, थरथरणार्‍या हातांना मदतीची नव्हे, तर कामाची आस असल्याचे मोठय़ा अभिमानाने जव्हेरी दांपत्य सांगतात. उतरत्या वयात आणखीनच हालाखीचे जीवन जगणार्‍या या दांपत्याला आयुष्यात एक दिवस नक्कीच सुखाचा उजाडेल, अशी आशा आहे.