शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’ योजनेवर आज फैसला

By admin | Updated: May 17, 2017 02:19 IST

मुंबईत बैठक : मनपा आयुक्त रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) शासनाकडे सादर करण्यात आला असून, यासंदर्भात उद्या (बुधवार) नगर विकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीत ‘भूमिगत’च्या योजनेला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. बैठकीसाठी मनपा आयुक्त अजय लहाने मंगळवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले. केंद्र शासनाच्या ‘अमृत’योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सादर केलेल्या २५४ कोटींच्या प्रकल्प अहवालाला राज्य शासनाने मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यासाठी ११० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला असून, त्यापैकी ८७ कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. योजनेंतर्गत मुख्य जलवाहिनी बदलण्यासह शहरात विविध ठिकाणी आठ जलकुंभ उभारल्या जातील. सदर काम पूर्ण होताच ‘अमृत’योजनेच्या माध्यमातून सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना राबवण्यात येईल. योजनेच्या माध्यमातून नाले-गटारांमधील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा शेती, उद्योगांसाठी वापर करता येऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी दुहेरी योजना निकाली काढण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. योजनेमध्ये एकूण प्रकल्पाच्या किमतीच्या केंद्र शासनाचा ५० टक्के आर्थिक हिस्सा असून, राज्य शासन व मनपाने प्रत्येकी २५ टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे भाग आहे. भूमिगत गटार योजनेचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपवले. त्यानुषंगाने मजीप्राने ११० कोटींचा डीपीआर तयार करून शासनाकडे सादर केला. यासंदर्भात उद्या (बुधवार) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीचे आयोजन केले असून, त्याकरिता मनपा आयुक्त अजय लहाने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एमएलडी प्लान्टवरून काथ्याकूट!मजीप्राने प्रस्तावित केलेल्या डीपीआरनुसार पूर्व झोनमध्ये ३० किंवा ७ एमएलडी आणि पश्चिम झोनमध्ये ३० एमएलडीचा प्लान्ट उभारला जाईल. पूर्व झोनमधील प्लान्ट कृषी नगर परिसरात रेल्वे लाइनला लागून उभारला जाईल. पूर्व झोनमध्ये ३० किंवा ७ एमएलडीचा प्लान्ट उभारल्यास देखभाल-दुरुस्तीचा किती खर्च येईल, या मुद्यावरून काथ्याकूट सुरू असल्याची माहिती आहे. वेळप्रसंगी पूर्व झोनमध्ये ३० एमएलडी प्लान्टवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.