शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गुंठेवारी अधिकृत करण्याचा निर्णय हवेत विरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:03 IST

गेल्या तीन वर्षात कार्यवाही करण्याचा कोणताही आदेश महसूल, नगर विकास विभागाला अद्यापही देण्यात आलेला नाही.

-  सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरांमध्ये गुंठेवारीनुसार जमिनीचे तुकडे पाडून त्यावर केलेली बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जुलै २०१६ मधील बैठकीत घेतला होता. त्यानुसार गेल्या तीन वर्षात कार्यवाही करण्याचा कोणताही आदेश महसूल, नगर विकास विभागाला अद्यापही देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, राज्यातील ५० लाख कुटुंबांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते मात्र त्यांचे मंत्रीपद गेल्यानंतर हा निर्णय सुद्धा थंडबस्यात पडला.राज्यातील सर्वच शहरांमध्ये गुंठेवारीनुसार भूखंड खरेदी करून त्यावर केलेले बांधकाम अनधिकृत समजले जाते. त्यामुळे त्या कुटुंबांवर सातत्याने कारवाईची टांगती तलवार असते. मंत्रिमंडळाच्या जुलै २०१६ मधील बैठकीपर्यंत राज्यात ५० लाख कुटुंब गुंठेवारी भूखंडांवर बांधकाम करून राहत असल्याची आकडेवारी होती.राज्यात जमिनीचे तुकडे बंदी कायदा अस्तित्त्वात आहे. जमिनीच्या प्रकारानुसार तिचे किमान प्रमाणभूत क्षेत्र ठरवल्यानंतर त्यापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे पाडता येत नाहीत. त्यामुळे कोणत्याही कृषक जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करता येत नाही, तसेच तुकड्यातील शेतजमिनीचे एकत्रीकरण करण्यासही विशिष्ट कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. त्यामुळे महापालिका, नगर परिषदा, नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील जमिनीचा निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक कारणासाठी वापर करावयाचा असल्यास शासनाकडून विशेष सवलत मिळवावी लागते; मात्र तशी कोणतीही परवानगी न घेताच अनेक शहरांमध्ये जमिनीचे गुंठे पाडून विक्री करण्यात आली, तसेच काही जमीन मालकांनी स्वत:ही बांधकाम केले आहे. कायद्यानुसार ती बांधकामे अनधिकृत आहेत. त्यांच्यावर कारवाईही केली जाते. त्यावर मंत्रिमंडळाने जुलै २०१६ मधील बैठकीत निर्णय घेत दिलासा दिल्याचा निर्णय कागदोपत्री घेतला. त्यामध्ये स्थानिक बांधकाम नियमावलीतील तरतुदीनुसार बांधकामे अधिकृत करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही तत्कालिन महसूल मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले होते.मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर गेल्या तीन वर्षात कोणताही आदेश महसूल, नगर विकास विभागाकडून संबंधितांना देण्यात आलेला नाही, त्यामुळे अनधिकृत बांधकाम असलेल्या ५० लाख कुटुंबांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार गेल्या तीन वर्षात शासनाकडून सुरू असल्याचेच त्यातून उघड होत आहे.

गुंठेवारीची प्रकरणे आधी दिलेल्या मुदतवाढीनुसार २०१३ पर्यंतचे प्रस्ताव महापालिकेकडून प्राप्त होत आहेत. त्यानंतरची प्रकरणे आलेली नाहीत. शासनाकडून आदेशही मिळालेले नाहीत.- योगेश कुळकर्णी, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग