अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील गुडधी विभागात असलेल्या विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या मोठय़ा उमरीतील एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भगीरथीनगरातील रहिवासी शैलेश सुरेश शिंदे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. तो मित्रांसोबत पोहत असताना अचानक विहिरीत ओढल्या गेला. त्यानंतर काही वेळातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केले. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
By admin | Updated: September 7, 2015 01:45 IST