शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेमुळे कमरेला बांधलेले चाकू पोटात घुसल्याने युवकाचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2017 02:31 IST

नवीन हायवेवरील घटना; जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे इसमाच्या कमरेला बांधलेले दोन धारदार चाकू पोटात घुसल्याने, युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी नवीन हायवे (हिंगणा शिवार) वर घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. नायगाव येथे राहणारा शेख चाँद शेख गुलाब (२0) याने दिलेल्या तक्रारीनुसार मतिनोद्दीन अलिमोद्दीन वय २३ (रा. आकोट फैल) हे एमएच ३0 आर ७८0३ क्रमांकाच्या मोटारसायकलने नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास जात होते. दरम्यान त्याने हिंगणा शिवारात मोटारसायकल रस्त्याला कडेला उभी केली. समोरून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाला त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकाने त्यांच्या अंगावर वाहन आणून त्यांना धडक दिली. मतिनोद्दीन यांच्या कमरेला यावेळी धारदार दोन चाकू बांधलेले होते. वाहनाने धडक दिल्यामुळे कमरेला बांधलेले दोन्ही चाकू त्याच्या पोटात घुसले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी नऊ इंच लांबीचे दोन धारदार चाकू जप्त केले आहेत. शेख चाँद याच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३0४(अ) नुसार गुन्हा दाखल केला. मृतकाने लुटमार करण्याच्या उद्देशानेच अडविले वाहनवाहनाच्या धडकेमुळे कमरेला बांधलेले चाकू पोटात घुसून मतिमोद्दीन (२३) याचा मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांच्या माहितीनुसार मतिमोद्दीन व त्याच्या सहकार्‍याने लुटमार करण्याच्या उद्देशानेच वाहन अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहनचालकाला संशय आल्याने, त्याने थेट त्याच्या अंगावरच वाहन घातले. सहकारी शेख चाँद हा बाजूला उभा असल्याने बचावला. मतिमोद्दीन याच्यावर बाळापूर येथे भादंवि कलम ३९२ गुन्हा दाखल आहे. लुटमार करण्याच्या हेतूने ते राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलने फिरत होते, अशी माहिती जुने शहरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली. घरून घेतले चाकू मृतक मतिमोद्दीन व त्याचा सहकारी शेख चाँद हे मोटारसायकलने दुपारी सैलानी दर्गा येथे गेले. तेथून शुक्रवारी रात्री ११ वाजता दोघे निघाले. मध्यरात्री अकोल्यात आल्यावर ते नायगावला घरी आले. लुटमार करण्याच्या उद्देशाने दोघांनी घरातून दोन धारदार चाकू घेतले आणि राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणा शिवारात आले.