पिंजर (जि.अकोला): उष्माघाताने पिंजर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात उष्माघाताने बळी पडलेल्यांची संख्या रविवारी नऊवर पोहोचली आहे. उज्ज्वला बोळे (४८) हे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली. मंगळवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
उष्माघाताने महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 23, 2016 01:52 IST