शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

By admin | Updated: June 30, 2014 01:54 IST

मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना पातूर रोडवर घडली.

अकोला: मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास पातूर रोडवर घडली. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत जुने शहर पोलिसांनी नोंद केली नव्हती. जठारपेठेतील केला प्लॉटमध्ये राहणारे श्रीराम गुल्हाने व त्यांच्या पत्नी कुसूम गुल्हाने हे रविवारी सकाळी १0 वाजता मोटारसायकलने पातूर रोडवरील संत आसाराम बापू आश्रमामध्ये सत्संगासाठी गेले होते. येथून दुपारी परत येत असताना रोडवरील खड्डा चुकविताना श्रीराम गुल्हाने यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. मोटारसायकल घसरून पडल्याने कुसूम गुल्हाने या खाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्या मरण पावल्याचे सांगितले. कुसूम गुल्हाने यांचा मुलगा र्जमनी येथे असतो. सोमवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या केला प्लॉटमधील निवासस्थानहून कुसूम गुल्हाने यांची अंत्ययात्रा निघणार आहे.