अकोला : उरळजवळील मोरझाडी येथील मोरखडे कुटुंबातील पाच जणांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतामध्ये विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाचही जणांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास रेखा अनिल मोरखडे (४५) यांचा मृत्यू झाला. बाळापूर तालुक्यातील मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५७), रेखा अनिल मोरखडे (४५), धीरज अनिल मोरखडे (२0), आधार ऊर्फ सुरज अनिल मोरखडे(१८) आणि प्रीती अनिल मोरखडे (१५) यांनी त्यांच्या शेतामध्ये गुरुवारी सकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या पाचही जणांना सुरुवातीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु त्यांची प्रकृती पाहता, डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले. पाच जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. एकाच कुटुंबातील हे पाचही सदस्य मृत्यूशी झुंज देत होते. शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास यातील रेखा अनिल मोरखडे हिचा मृत्यू झाला. उर्वरित चार जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सामूहिक आत्महत्येचा प्रयत्नातील पत्नीचा मृत्यू, चौघांची प्रकृती स्थिर
By admin | Updated: January 3, 2015 00:48 IST