शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मळणी यंत्रात रुमाल अडकून फाशी बसल्याने इसमाचा मृत्यू

By admin | Updated: January 12, 2015 23:32 IST

बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील घटना.

बुलडाणा : शेतात तुर काढीत असताना एका इसमाचा रुमाल मळणीयंत्रात अडकल्यामुळे गळफास लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास डोंगरखंडाळा येथे घडली. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील नारायण छोटू चव्हाण (३८) याने बोराळा शिवारात शेती ठोक्याने घेतली होती. या शेतातील तुर मळणी यंत्राव्दारे काढण्याचे आज ठरविण्यात आले होते. दुपारी इंजीनवरील मळणी यंत्रातून तुर काढीत असताना नारायण चव्हाण हे तुरीचे कुटार काढण्यासाठी मळणी यंत्राजवळ गेले असता तेवढय़ात त्यांच्या गळयातील रुमाल मळणी यंत्राच्या रबरी पट्टयात अडकला. त्यामुळे मानेला गळफास लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी उपस्थित मजूरांनी तत्काळ मशिन बंद केली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेची माहिती मिळताच गावातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामिण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभुमित शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्या त आले. प्रकरणी ग्रामिण पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.