लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील अकोला-कारंजा नाक्यावर एसटी बसमधून उतरून रोड क्रॉस करताना दुसर्या एसटी बसचा धक्का लागून खाली पडल्याने बसच्या मागील चाकात येऊन ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता घडली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथील शेतमजूर असलेला शालीकराम बळीराम गवई (६५) हे बसमधून उतरून रस्ता ओलांडत होते. यावेळी मूर्तिजापूर आगाराच्या बस क्र. एमएच ४0 वाय ५७१७ चा धक्का लागून ते बसच्या मागील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक गणेश कोथळकर हे पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर वृद्धाला त्याच अवस्थेत रुग्णालयात पाठविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चालक व्ही. एस. मोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत वृद्धाच्या परिवारास मूर्तिजापूर आगाराच्यावतीने तत्काळ १0 हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती विजय साबळे यांनी दिली आहे. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.
बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:36 IST