अकोला - बुलडाणा जिल्हय़ातील निमकरा येथील रहिवासी जळालेल्या महिलेचा शुक्रवारी सवरे पचार रुग्णालयात मृत्यू झाला. पल्लवी राजेश झाल्टे (२५) या महिलेला जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी पहाटे सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सदर महिलेचा सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दुसर्या एका घटनेत जिल्हय़ातील महान येथील रहिवासी जवेरिया परवीन सै. हैदर (३0) या महिलेचा शुक्रवारी सकाळी सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी पहाटे या महिलेला सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र काही वेळातच सदर महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
जळालेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 9, 2015 01:57 IST