शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आणखी एकाचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 18:32 IST

CoronaVirus in Akola मुंडगाव येथील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५५ वर गेला आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. रविवार, ११ आॅक्टाबर रोजी अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५५ वर गेला आहे. रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये नऊ, असे एकून २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८१७  झाली आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५९  अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ रुग्णांचे  अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये पैलवाडा येथील दोन जणांसह निंबा, भीम नगर, गजानन नगर, खडकी, केशव नगर, किसरा कॉलनी, बाळापूर, वाल्मिकी नगर, बाळापूर नाका, कापसी ता. पातूर व जीएमसी क्वॉर्टर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. 

मुंडगाव येथील वृद्धाचा मृत्यूरविवारी   मुंडगाव, ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना ५ आॅक्टोंबर  रोजी दाखल करण्यात आले होते. 

७७ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १९, ओझोन हॉस्पीटल, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक, सुर्यचंद्र  हॉस्पीटल, हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी एक,  तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ५४  अशा एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

रॅपिड चाचण्यांमध्ये ९ पॉझिटिव्हशनिवारी दिवसभरात झालेल्या १११  रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये नऊ  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.    आतापर्यंत  १८९४०  चाचण्यांमध्ये १३६७  जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

५१५  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८१७  जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५१५    अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या