शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य साठवणुकीचा तिढा सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:30 IST

माथाडी मंडळाच्या मध्यस्थीने या कामाचा तिढा सुटला असून, शुक्रवारपासून काम सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप केले जाणारे धान्य भारतीय खाद्य निगमकडून केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माथाडी मंडळाच्या मध्यस्थीने या कामाचा तिढा सुटला असून, शुक्रवारपासून काम सुरू झाले आहे. या गोदामातील कामगारांच्या दुराग्रहामुळे पंधरा दिवसात धान्य साठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून धान्य खरेदी केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी खाद्य निगमने केंद्रीय वखार महामंडळाचे अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गोदाम भाड्याने घेतले आहेत. गोदाम क्रमांक दोनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देय असलेल्या धान्याचा साठा करण्याचे काम सुरू असतानाच वखार महामंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पंधरा दिवसांपासून अचानक काम बंद करण्यात आले. कामगारांनी त्यांच्या मागणीसाठी वखार महामंडळाच्या ‘एच अ‍ॅण्ड टी’ काम करणाºया व्यवस्थापनाकडे दाद न मागता माथाडी मंडळाकडे धाव घेतली, तसेच त्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक काळ काम बंदही ठेवले.दरम्यान, जिल्हाधिकाºयांना लाभार्थींसाठी देय असलेल्या धान्य साठ्याचे काम बंद झाल्याने जिल्हा प्रशासनाचीही अडचण झाली. याप्रकरणी माथाडी मंडळाने कामगारांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली, तसेच कामगारांच्या मागण्यांबाबत वखार महामंडळ, ‘एच अ‍ॅण्ड टी’ व्यवस्थापनाकडूनच निर्णय घेणे आवश्यक असताना जिल्हाधिकाºयांच्या धान्याचे काम बंद ठेवण्याबद्दल गोदाम व्यवस्थापक एन.बी.सिंग यांना नोटिसही बजावली. तरीही काम सुरू न झाल्याने भारतीय खाद्य निगमने याची गंभीर दखल घेत केंद्रीय वखार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापकांसह सिंग यांना दोन नोटिस बजावल्या. या कागदपत्रांच्या गदारोळात धान्य साठ्याचे काम तब्बल १५ दिवस बंद राहिले. दरम्यान, खाद्य निगमचे नागपूर विभागीय व्यवस्थापक बी.एम.राऊत यांनी २ जून रोजी पुन्हा नोटिस देत धान्य साठ्याचे काम सुरू करण्याचे वखार महामंडळाला बजावले. त्यानंतर ५ जून रोजी काम सुरू केल्याचे गोदाम व्यवस्थापक सिंग यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोला