लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौकातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.पोळा चौकातील रहिवासी शंकर वाघमारे यांची १३ वर्षीय मुलगी सीमा शिवाजी शाळेत शिक्षणासाठी आहे. सीमा शनिवारी सकाळी घरून शाळेत जाण्यासाठी गेली होती. शाळा सुटल्यानंतरही दुपारपर्यंत परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली; मात्र पोलिसांनी त्यांना एकदा शाळेत तिचा शोध घेण्याचे सांगितले. तिच्या आई-वडिलांसोबत पोलीसही शाळेत गेले; मात्र शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा ही शनिवारी शाळेतच आली नसल्याचे पोलीस व तिच्या आई-वडिलांना सांगितले. सीमा शाळेत गेली नसल्याने ती घरून गेल्यानंतरच बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यामुळे सीमाच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.-
मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:26 IST
अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौकातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.
मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा
ठळक मुद्देपोळा चौकातील मुलीचा शोध सुरू